Jordar pavsacha andaz ; पुढील 4 तासात या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ईशारा हवामान विभाग.
Jordar pavsacha andaz ; महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला असला तरी, राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. उन्हाचा चटका कायम असताना, हवामान विभागाने पुढील तीन ते चार तासांत काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आजचा हवामान अंदाज
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.
जोरदार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे: कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली; आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता: ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक. राज्याच्या उर्वरित भागात मात्र कोरडे हवामान राहून उन्हाचा चटका कायम राहील.
गुरुवारचा हवामान अंदाज
गुरुवारीदेखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे.
विजांसह पावसाचा अंदाज असलेले जिल्हे: कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड; मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा; आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असलेले जिल्हे: नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, मुंबई, ठाणे आणि पालघर.