तूर पिकामध्ये लवकरच फुलधारणेची अवस्था सुरू होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात ही अवस्था सुरू झाली असेल, तर पुढील १० ते १५ दिवसांमध्ये बहुतेक ठिकाणी फुलं दिसू लागतील. या अवस्थेमध्ये पिकावर जास्तीत जास्त फुलधारणा कशी होईल, फुलांची गळ कशी थांबवता येईल, अळीचे नियंत्रण कसे करता येईल आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण कसे ठेवायचे यासाठी योग्य फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
2) पहिले फवारणी संयोजन (Combination)
जास्तीत जास्त फुलधारणा वाढवण्यासाठी पहिले संयोजन वापरता येईल:
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
टोनिक: फन्टॅक प्लस (Funtaac Plus) – १५ लिटर पंपासाठी १५ मिली.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सूक्ष्म अन्नद्रव्य: चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट – ३० ग्रॅम (सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फुलं कमी निघतात, ती कमतरता भरून काढण्यासाठी).
बुरशीनाशक: टिल्ट (Tilt) – १५ मिली (फुलांच्या अवस्थेत चांगले परिणाम देते).
कीटकनाशक (अळी नियंत्रण):
इव्हिसेंट (Evisect) – ३ ग्रॅम.
हे चार घटक एकत्र करून फवारल्यास जास्तीत जास्त फुलधारणा होऊन अळी आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवता येते.
3) दुसरे फवारणी संयोजन (Combination)
ज्या शेतकऱ्यांकडे पहिले संयोजन उपलब्ध नसेल, ते खालील दुसरे संयोजन वापरू शकतात:
फुलधारणा वाढवण्यासाठी:
फ्लॉवर स्ट्रॉंग (Flower Strong) – ३० मिली आणि वर चमत्कार (Var Chamatkar) – ५ मिली. या औषधांमुळे फुलांची वाढ चांगली होते, फुलांची गळ थांबते आणि नवीन फुटवा वाढण्यास मदत होते.
बुरशीनाशक:
टिल्ट (Tilt) – १५ मिली (बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी).
कीटकनाशक (अळी नियंत्रण):
बॅराझिड (Barazide) – ३५ मिली.
शेतकऱ्यांनी या दोन संयोजनांपैकी जे औषध उपलब्ध असेल, त्यापैकी कोणत्याही एका संयोजनाचा वापर करावा.
4) फवारणीची योग्य वेळ
या फवारणीचे जास्तीत जास्त परिणाम मिळवण्यासाठी, ज्यावेळी तूर पिकात पाच ते दहा टक्के फुलधारणा झालेली असेल, त्याच वेळी फवारणी करावी. योग्य वेळी फवारणी केल्यास फुलधारणा मोठ्या प्रमाणात वाढते आणि अळी व फुलांची गळ नियंत्रणात राहते.