Maharashtra rain news ; मोंथा चक्रीवादळाचा परिणाम आणखी किती दिवस राहणार.
Maharashtra rain news ; बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. बुधवारी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीला मोठा फटका बसला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
किनारपट्टीवर वादळी वारे सुटल्याने जिल्ह्यातील सर्वच मासेमारी नौका बंदरांमध्ये थांबल्या आहेत आणि मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात समुद्रात वादळसदृश स्थिती उद्भवेल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला होता. त्या अंदाजानुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सातत्याने हवामानात बदल घडत आहेत.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात कोकण किनारपट्टीवर दिसून येत आहे. मागील आठवडाभर कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. काल (ता. २८) एक दिवसाचा अपवाद वगळता पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा निश्वास सोडला होता. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भात सुकवून गोळा केले आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. आज सकाळी कापणीला पुन्हा सुरुवात झाली, मात्र दुपारनंतर अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरण तयार झाले.
समुद्र खवळला असून उंचच लाटा उसळत आहेत. त्यामुळे मिरकरवाडा, जयगड, हर्णै, साखरीनाट्ये, काळबादेवी यांसारख्या बंदरांमध्ये शेकडो नौकांचा मुक्काम वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून या नौका समुद्रातील वादळसदृश स्थितीमुळे आश्रयाला आहेत. समुद्रातील वातावरण निवळण्यापूर्वीच पुन्हा वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने हवामान विभागाने मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर, किनारपट्टी भागातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गुजरात, डहाणू, मालवण यांसारख्या भागांतील नौकादेखील या बंदरांमध्ये आश्रयाला आहेत. समुद्रातील वातावरण पूर्णपणे निवळल्यानंतरच खोल समुद्रातील मासेमारी पुन्हा सुरू होईल, अशी माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
अनेक ठिकाणी भातपीक आडवे
जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात आणि नाचणीचे पीक सध्या कापणीसाठी तयार आहे. ग्रामीण भागामध्ये भातकापणीची कामे सुरू आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे कापलेले भात शेतातच भिजत आहे. अनेक ठिकाणी उभे पीक आडवे झाले आहे. १ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील १७० गावांमधील १७४.२० हेक्टर क्षेत्रावरील पीक आधीच बाधित झाले आहे. यामध्ये सुमारे पावणेसोळा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आजही दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि सायंकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला. यामुळे मच्छीमार, शेतकरी आणि व्यापारी या तिघांचीही चिंता वाढली आहे.