शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा!
१.बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर निर्णायक बैठक
शेतकरी नेते बच्चू कडू यांनी नागपूर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी मोठे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलक नेत्यांची आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बुधवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे आंदोलनाचा उद्देश सफल झाल्याचे चित्र आहे.
२.३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची घोषणा.
या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. “आमच्या जाहीरनाम्यात आम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती,” असे सांगत, ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता कर्जमुक्तीचा मार्ग निश्चित झाला आहे.
३.बच्चू कडूंची हायकोर्टात ‘रेल्वे रोको’ न करण्याची ग्वाही.
शेतकरी आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. यासंदर्भात नागपूर खंडपीठाने दखल घेतली होती. या पार्श्वभूमीवर, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला लेखी ग्वाही दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता रेल्वे रोको’ आंदोलन करण्यात येणार नाही.




 
		
















