जमिनीचा नकाशा गट क्रमांक टाकून कसा पाहायचा?
शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असेल किंवा आपल्या जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील, तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा उपलब्ध असणे आवश्यक आहे. आता सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. या लेखात आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा, तो कसा वाचायचा आणि सरकारचा ई-नकाशा प्रकल्प काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्याची प्रक्रिया
जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी तुमच्या ब्राऊजरमध्ये mahabhu nakasha.mahabhumi.gov.in असे सर्च करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेबपेज उघडेल.
या पेजवर तुम्हाला ‘search by plot number’ नावाचा एक रकाना दिलेला दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यावर तुमच्या जमिनीचा गट नकाशा स्क्रीनवर लगेच ओपन होतो.
नकाशा वाचणे आणि गट माहिती पाहणे
नकाशा पाहण्यासाठी, ‘होम’ या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून त्यानंतर वजाबाकीचे (-) बटण दाबून तुम्ही संपूर्ण नकाशा पाहू शकता.