Maharashtra rain update ; राज्यातील वातावरणात मोठा बदल पुढील 24 तासात पावसाच्या सरीचा अंदाज.
Maharashtra rain update ; मान्सूनच्या परतीनंतर राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाळी वातावरणाची पुन्हा एकदा निर्मिती झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून, आज (२१ ऑक्टोबर) सायंकाळपासून दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
अरबी समुद्रातील हवामान प्रणालीचा प्रभाव कमी होत असतानाच, बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या पूर्वेला चक्राकार वाऱ्यांची एक नवीन प्रणाली सक्रिय झाली आहे. ही प्रणाली अधिक तीव्र होऊन उद्यापर्यंत (२२ ऑक्टोबर) तिचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. याच्या परिणामी, राज्यात पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहत असून, त्यामुळे पावसाची शक्यता वाढली आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
आज सायंकाळपासून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ढगांची निर्मिती होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. रात्रीच्या वेळी पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढू शकते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या, म्हणजेच मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून पावसाचा जोर आणि क्षेत्र दोन्ही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विदर्भ विभागातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथेही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आणि कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही सतर्कतेचा इशारा आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पुढील दोन दिवसांच्या अंदाजानुसार, बुधवार, २३ ऑक्टोबर रोजी विदर्भात पावसाचा प्रभाव कायम राहील, विशेषतः गडचोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ असेल, तर उर्वरित महाराष्ट्रात जोर कमी होईल. गुरुवार, २४ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा प्रभाव आणखी कमी होऊन तो मुख्यत्वे विदर्भातील काही जिल्ह्यांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी आपल्या काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी आणि शेतीची कामे हवामानाच्या अंदाजानुसारच करावीत, असे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.