Maharashtra rain news ; येत्या 24 तासात पावसाचा अंदाज
Maharashtra rain news ; राज्यातून मान्सून परतला असला तरी, मान्सूनोत्तर पावसाचा जोर कायम आहे. आज, १७ ऑक्टोबर रोजी, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे, जळगाव, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात पावसासाठी पोषक हवामान
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात आजही पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता कायम आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पावसाचा जोर प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तर भागात दिसून येईल.
आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता
आज दिवसभरात धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांच्या उत्तरेकडील भागांत, विशेषतः मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या प्रदेशात, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र नसला तरी ठिकठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात.
उर्वरित जिल्ह्यांत स्थानिक स्थितीवर पाऊस अवलंबून
याव्यतिरिक्त, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बुलढाणा, अकोला, गोंदिया, सोलापूर, धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता पूर्णपणे स्थानिक ढगनिर्मितीवर अवलंबून असेल. या भागांत दुपारनंतर ढग जमा झाल्यास तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील, अन्यथा हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये आज पावसाची शक्यता सध्या कमी आहे.