Ladki bahin October ; लाडकी बहीण योजना 16 वा हप्ता दिवाळी अगोदर येणार का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी येणार का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न अनेक महिला लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे.
ऑक्टोबर महिन्याचा हा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करणे आवश्यक असते. निधी मंजूर झाल्यानंतर किती निधी देण्यात आला आहे, यासाठी राज्य सरकार एक शासन निर्णय (जीआर) निर्गमित करते.
त्या शासन निर्णयामध्ये जेवढे लाभार्थी पात्र आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये किती रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे, याचा उल्लेख केलेला असतो. सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता किंवा दिवाळीपूर्वी हप्ता जमा होणार आहे, या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सप्टेंबर महिन्याचा हप्ता मागील आठवड्यापासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे, शक्यतो दिवाळीनंतरच हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा केला जाऊ शकतो.