पाऊस लवकरच विश्रांती घेणार पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज.
Read More
नोव्हेंबरमध्येही पाऊस, या तारखेपर्यंत विश्रांती नाहीच ; गजानन जाधव हवामान अंदाज.
नोव्हेंबरमध्येही पाऊस, या तारखेपर्यंत विश्रांती नाहीच ; गजानन जाधव हवामान अंदाज.
Read More
सोयाबीन हमीभाव खरेदीला शासनाच्या नव्या धोरणाचा ‘ब्रेक’; शेतकरी क्विंटलमागे हजारो रुपये तोट्यात.
सोयाबीन हमीभाव खरेदीला शासनाच्या नव्या धोरणाचा ‘ब्रेक’; शेतकरी क्विंटलमागे हजारो रुपये तोट्यात.
Read More
लाडकी बहीण KYC फक्त दोनच मिनिटात..मोबाईलवरून..New प्रोसेस लाडकी बहीण KYC
लाडकी बहीण KYC फक्त दोनच मिनिटात..मोबाईलवरून..New प्रोसेस लाडकी बहीण KYC
Read More

Ladki bahin installment ; लाडकी बहीण योजना आँक्टोंबरचा हप्ता लवकरच येनार खात्यात.

Ladki bahin installment ; लाडकी बहीण योजना आँक्टोंबरचा हप्ता लवकरच येनार खात्यात.

Ladki bahin installment ; राज्यात लवकरच होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी असणारी केवायसी (KYC) करण्याची अट शिथिल होण्याची दाट शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयावर राज्य शासन विचार करत असून लवकरच या संदर्भातील अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

या योजनेची केवायसी प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू झाली आणि साधारणपणे दोन महिन्यांच्या कालावधीत ती पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे, लाभार्थ्यांच्या घरात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहेत का, तसेच एका घरामध्ये किती महिला लाभार्थी आहेत आणि त्यांची जात प्रवर्ग काय आहे, या सर्व बाबी तपासण्याचा शासनाचा हेतू होता.

केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. योजनेचे पोर्टल व्यवस्थित सुरू नसणे, त्यामुळे महिलांना रात्री-अपरात्री केवायसी करावी लागणे, अशा समस्या समोर आल्या. विशेषतः विधवा महिला, अविवाहित मुली आणि ज्यांच्याकडे वडील किंवा पती यांचे आधार कार्ड उपलब्ध नव्हते, अशा अनेक महिलांना केवायसी पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या.

Leave a Comment