Ladki bahin 6000 rs ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थकीत ₹6000 तात्काळ हे काम करा.
Ladki bahin 6000 rs ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹६००० ची रक्कम जमा करण्यात आली आहे. ज्या महिला जून महिन्यापासून हप्त्यासाठी पात्र असूनही विविध कारणांमुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नव्हती, अशा भगिनींसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. खात्यात जमा झालेली ही रक्कम जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांचे थकीत हप्ते आहे.
थकीत रक्कम न मिळाल्यास काय करावे?
ज्या महिलांना विनाकारण अपात्र ठरवण्यात आले होते आणि ज्यांना अजूनही ₹६००० मिळाले नाहीत, त्यांनी तात्काळ आपली ई-केवायसी (eKYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला थकीत रक्कम आणि पुढील हप्ते मिळण्यास सुरुवात होईल.
अनेक महिला भगिनींना पूर्वी विनाकारण अपात्र ठरवले गेले होते, पण ई-केवायसी पूर्ण केल्यामुळे त्यांच्या पात्रतेची सत्यता उघड झाली आहे आणि त्या पुन्हा पात्र ठरल्या आहेत:
उत्पन्नाची मर्यादा: काही महिलांना ₹२.५ लाखांहून अधिक उत्पन्न दाखवले गेल्यामुळे अपात्र ठरवले होते. प्रत्यक्षात उत्पन्न कमी असलेल्या अशा महिलांना ई-केवायसीनंतर पात्र ठरवण्यात आले आहे.