Fertilizer prices 2025 खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ? खतांच्या भावात पुन्हा वाढ.
खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ?
खतांच्या भावात पुन्हा वाढ.
शेतकरी आधीच अतिवृष्टी, कीडरोग, बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ऐन हंगामात अचानक दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खतांमध्ये प्रति बॅग मागे २०० ते ३०० इतकी दरवाढ झाली आहे.
विविध मिश्र खतांचे दर वाढले, परंतु शेतीमालाचे भाव अजूनही म्हणावे तसे वाढले नाहीत. कापूस, सोयाबीन, भाजीपाला, अशा प्रमुखपिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हंगामाचा हिशेब जुळवणे कठीण झाले आहे. आता रब्बी हंगाम पुढे येऊन ठेपला आहे.
गहू, हरभरा आदी पिकांना खताची गरज भासणार आहे. येणाऱ्या काळात अजूनही पुन्हा खताच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

















