मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीची (e-KYC) अट तूर्तास रद्द.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीची (e-KYC) अट तूर्तास रद्द.
Read More
कांद्याचे बाजारभाव ; चालू आठवड्यात कांद्याला काय बाजारभाव मिळतोय पहा.
कांद्याचे बाजारभाव ; चालू आठवड्यात कांद्याला काय बाजारभाव मिळतोय पहा.
Read More
Panjab dakh rain update ; आज पासून जोरदार पाऊस, हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज.
Panjab dakh rain update ; आज पासून जोरदार पाऊस, हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज.
Read More
डॉ. रामचंद्र साबळे अंदाज ; २२ ते २९ ऑक्टोबरचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला.
डॉ. रामचंद्र साबळे अंदाज ; २२ ते २९ ऑक्टोबरचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला.
Read More

Agriculture information ; तूर कळी अवस्थेत असताना कोणती फवारणी करावी.

Agriculture information ; तूर कळी अवस्थेत असताना कोणती फवारणी करावी.

Agriculture information ; तूर पीक सध्या कळी अवस्थेत आलेले असून यानंतर जास्तीत जास्त फुलधारणा अवस्था येणार आहे. याच अवस्थेमध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन तूर उधळण्याची समस्या नियंत्रित करण्यासाठी नेमकी कोणती फवारणी घ्यावी, याबद्दल शेतकरी विचारणा करत आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेले घटक असलेले औषध तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचे फवारणीसाठी वापरू शकता.

जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्याला एखादे चांगले बायोस्टिमुलंट किंवा अमिनो ऍसिड असलेले औषध फवारणीसाठी वापरणे गरजेचे आहे. यासाठी कोरमंडल इंटरनॅशनल कंपनीचे फनटॅक प्लस (२० मिली प्रति १५ लिटर फवारणी पंपसाठी) किंवा पाटील बायोटेक कंपनीचे बायोस्टिमुलंट झकास गोल्ड (५ मिली प्रति १५ लिटर फवारणी पंपसाठी) वापरता येते. याशिवाय टाटा बहार यांसारख्या औषधांचा वापर केला तरी चालतो.

सध्याच्या काळात तूर पिकामध्ये पान गुंडाळणारी अळी (Leaf Folder) दिसून येते. ही अळी पानांमध्ये लपून पिकाचे नुकसान करते. तिचे नियंत्रण करण्यासाठी चांगल्या कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. चांगल्या अळीनाशकाचा विचार केल्यास तुम्ही कोरेजन (क्लोरेंथनीप्रोल १८.६ टक्के) हे अळीनाशक ६ मिली प्रति १५ लिटर फवारणी पंपसाठी वापरू शकता. शेतकऱ्यांनी एक टॉनिक आणि एक अळीनाशक याचा वापर करणे अनिवार्य आहे.

Leave a Comment