हवामान विभाग ; हवामान खात्याचा ताजा अंदाज राज्यात धो धो पाऊस.
देशात अनेक ठिकाणी हवामान अस्थिर असून, येत्या काही दिवसांत दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील सात दिवसांसाठी केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांतील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दक्षिण आणि मध्य भारतातील हवामान
१२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारपट्टीचा भाग आणि यानम येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे.
विजांचा कडकडाट आणि वादळी वारे
पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये विजांसह वादळे आणि जोरदार वारे वाहतील:
१२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान: केरळ, माहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारा, यानम, रायलसीमा आणि तेलंगणा.