शेतकरी कर्जमाफीचे वेळापत्रक ठरले ; आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतून मोठी बातमी.
१.बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे निर्णायक बैठकीला यश.
संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जमाफीच्या संदर्भातील बैठक अखेर पार पडली आहे. शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर ही बैठक मुख्यमंत्री यांच्यासोबत झाली. या बैठकीतून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची महत्त्वाची माहिती दिली आहे.
२.रबी हंगामासाठी तात्काळ आर्थिक मदत आणि कर्ज वसुलीला स्थगिती.
बैठकीदरम्यान, सध्या रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज लक्षात घेऊन शासनाने पाऊल उचलले आहे. निविष्ठ अनुदान आणि रबी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बी-बियाणे आणि खतांसाठी अनुदान स्वरूपात रकमा दिल्या जात आहेत.
३कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी समिती गठीत.
शेतकऱ्यांची कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी शासनाने एक समिती गठीत केली आहे. परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पुढील सहा महिने अभ्यास करणार आहे. या समितीला अभ्यास करून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला संपूर्ण डाटा शासनाला सादर करायचा आहे.




 
		
















