HSRP Number plate update ; आता या तारखेपासून बसनार दंड, कारवाईचा दनका.
वाहनांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी अनिवार्य असलेल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यासाठी शासनाने वाहनधारकांना ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत hsrp साठी नोंदणी करून वाहनांना बसवने आवश्यक आहे..
१ डिसेंबरपासून कारवाईला सुरुवात…
ही मुदत शेवटची संधी असल्याचा स्पष्ट इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) दिला आहे. यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर ही चौथी आणि अंतिम मुदतवाढ आहे. १ डिसेंबर, २०२५ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे RTO ने स्पष्ट केले आहे….
राज्यात अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केलेली नाही, त्यामुळे ही लवकरात लवकर नंबर प्लेट बसवून घेनं आवश्यक आहे. अजूनही अनेक वाहनांची HSRP साठी नोंदणी केलेली नाही. या उदासीनतेला आणि तांत्रिक अडचणींना लक्षात घेऊन शासनाने दोन ते तीन वेळा मुदतवाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे, आता परत मुदतवाढ मिळनार नाही त्यामुळे वाहनधारकांनी या संधीचा फायदा घेऊन ३० नोव्हेंबरपूर्वी आपल्या वाहनांना HSRP बसवून घेणे आवश्यक आहे.




















