राज्यावर दुहेरी हवामान संकट ; ‘मोंथा’ चक्रीवादळाचे अवशेष विदर्भात, मुसळधार पावसाचा इशारा.
राज्यावर दुहेरी हवामान संकट ; ‘मोंथा’ चक्रीवादळाचे अवशेष विदर्भात, मुसळधार पावसाचा इशारा.
Read More
आंदोलनाची वाटचाल कर्जमाफी कडे”: नागपूर येथील शेतकरी आंदोलनाचा वाढता दबाव.
आंदोलनाची वाटचाल कर्जमाफी कडे”: नागपूर येथील शेतकरी आंदोलनाचा वाढता दबाव.
Read More
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १०,००० रुपये मदतीबाबत प्रश्नचिन्ह आणि मदतीचा विलंब.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १०,००० रुपये मदतीबाबत प्रश्नचिन्ह आणि मदतीचा विलंब.
Read More
हरभरा मर रोग नियंत्रण ; बीजप्रक्रिया आणि जुगाड पहा सविस्तर माहिती.
हरभरा मर रोग नियंत्रण ; बीजप्रक्रिया आणि जुगाड पहा सविस्तर माहिती.
Read More

थकीत पीकविमा 2024 चे वाटप सुरू या जिल्ह्यात पहा सविस्तर.

थकीत पीकविमा 2024 चे वाटप सुरू या जिल्ह्यात पहा सविस्तर.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. प्रलंबित असलेल्या खरीप पीक विमा २०२४ च्या वाटपाला अखेर सुरुवात झाली आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे ३३४ कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली होती, परंतु त्यानंतरही मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप होणे बाकी होते.

या थकीत रकमेसाठी राज्य शासनाने आवश्यक असलेले जवळपास १२१ कोटी रुपयांचे पूरक अनुदान पीक विमा कंपनीला दिले होते. हे अनुदान मिळाल्यानंतर लगेच वाटप होईल, अशी शक्यता असतानाही वितरण प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोठे आंदोलन केले, तसेच श्वेता महाले यांच्यासह इतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी या पीक विम्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

या सर्व प्रयत्नांना यश येऊन, अखेर याच मंजूर असलेल्या पीक विमा रकमेपैकी २१२ कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण वाटपामुळे जिल्ह्यातील जवळपास ६८,००० पेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्याच्या थकीत असलेल्या ४० ते ४५% पीक विम्यापैकी ही रक्कम वितरीत होत आहे.

Leave a Comment