Aadhaar Bank Account Link Status: तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यास अनेक कामांत अडथळा येऊ शकतो.
आधारकार्ड अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे आहे, ज्याचा वापर अनेक उद्देशांसाठी केला जात आहे. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडताना आधारची माहिती आणि केवायसी करणे बंधनकारक आहे. आधारकार्डमुळे अनेक महत्त्वाची कामे ठप्प होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात १२ हजार मुलांना यावर्षी त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नाही, कारण त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नव्हते. दरम्यान, तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, हे कसे तपासायचे? याची पद्धत जाणून घेऊयात.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ‘myAadhaar’ च्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुमची कोणती खाती आधारशी लिंक आहेत हे तुम्ही तपासू शकता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आरबीआयच्या नियमांनुसार, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाती असतील तर तुम्ही सर्व खाती आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
प्रकिया
1) सर्वात प्रथम आधारची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ भेट द्यावी.
2)यानंतर My Aadhaar येईल, त्यावर क्लिक करा आणि ड्रॉप डाउन मेनूवर जाऊन आधार सेवा निवडा
3)तिथे आधार आणि बँक लिंकिंग स्टेटस दिसेल, त्यावर क्लिक करा.
4)पुढच्या पेजवर तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका.
5)यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.
6)ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की तुमचे आधार कोणते बँक खाते लिंक आहे.
बँक खाते लिंक नसल्यास काय करावे
याशिवाय, तुमचे खाते आधारशी लिंक झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेतही जाऊ शकता. लिंक उपलब्ध नसल्यास तुम्ही बँकेत जाऊन आधार लिंक फॉर्म भरा. जिथे, तुमची आधार आणि पॅन माहिती द्या . तसेच केवायसी करा आणि त्यानंतर काही मिनिटांत तुमचे बँक खाते आधारशी लिंक होईल.




















