पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता ; लवकरच होणार जमा; महत्त्वाचे अपडेट्स
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून तीन वेळा २००० रुपयांची रक्कम जमा केली जाते. आता शेतकरी २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
निवडणुका आणि हप्त्याचे वितरण:
सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असून, या निवडणुका ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही राज्यांत वितरण पूर्ण:
काही राज्यांमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आधीच वितरित करण्यात आला आहे. २६ सप्टेंबर रोजी कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना हा हप्ता दिला होता. तसेच, जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यातही ७ ऑक्टोबर रोजी पैसे जमा करण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित राज्यातील शेतकरी आता २१ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
















