माणिकराव खुळे अंदाज ; राज्यात पाच दिवस वादळी पावसाची शक्यता: दोन कमी दाब क्षेत्रांचा परिणाम
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ (भारतीय हवामान खाते, पुणे) माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून सुरू होऊन पुढील पाच दिवस, म्हणजेच मंगळवार, २८ ऑक्टोबरपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. या अंदाजात केवळ उत्तर विदर्भाचा अपवाद वगळण्यात आला आहे.
पावसाचा अधिक जोर असलेले जिल्हे:
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
तारीख आणि जिल्ह्यांनुसार पावसाचा अंदाज:
२५ ऑक्टोबर: नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर.
२६ ऑक्टोबर: मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड.
२७ ऑक्टोबर: धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर.
२८ ऑक्टोबर: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, नांदेड.
















