12वीं पास के खुशखबरी! रेलवे ने TC समेत 3050 पदों पर निकाली बंपर वैकेंसी, जानें
12वीं पास के खुशखबरी! रेलवे ने TC समेत 3050 पदों पर निकाली बंपर वैकेंसी, जानें
Read More
पंजाब डख लाईव्ह अंदाज ; पावसाचा नवीन टप्पा २४ ते २८ ऑक्टोबर जोरदार पाऊस.
पंजाब डख लाईव्ह अंदाज ; पावसाचा नवीन टप्पा २४ ते २८ ऑक्टोबर जोरदार पाऊस.
Read More
तूर पिकाला कळी अवस्थेत यशस्वी फवारणी कोणती करावी.
तूर पिकाला कळी अवस्थेत यशस्वी फवारणी कोणती करावी.
Read More
Soyabin MSP, kharedi ; शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी थांबा, या तारखेपासून सोयाबीन हमीभावाने खरेदी होणार.
Soyabin MSP, kharedi ; शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी थांबा, या तारखेपासून सोयाबीन हमीभावाने खरेदी होणार.
Read More

पंजाब डख म्हणतात राज्यात आजपासून पावसाला सुरुवात, दररोज भाग बदलत पाऊस.

पंजाब डख म्हणतात राज्यात आजपासून पावसाला सुरुवात, दररोज भाग बदलत पाऊस.

मी पंजाब डख. आज २३ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज देत आहे. राज्यात आज २३ ऑक्टोबरपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. आज रात्रीच्या सुमारास लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होईल.

२४ ते ३० ऑक्टोबरपर्यंत पावसाची व्याप्ती वाढणार

२४ ऑक्टोबरपासून ते ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे. हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असेल, काही ठिकाणी तो जोरात पडेल तर काही ठिकाणी रिमझिम असेल, तर काही भागांना तो वगळूनही जाईल. उद्या, २४ तारखेला दुपारनंतर देखील राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस विजेच्या कडकडाटासह असणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अपेक्षित?

उद्या २४ ऑक्टोबरला नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी पूर्ण, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम या पट्ट्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. २५ तारखेला हा पाऊस पुढे सरकत नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या पट्ट्यात जाईल. २६ तारखेला मात्र परत राज्याचा खूप मोठा भाग या पावसाने व्यापून जाईल.

Leave a Comment