Agriculture information ; तूर कळी अवस्थेत असताना कोणती फवारणी करावी.
Agriculture information ; तूर कळी अवस्थेत असताना कोणती फवारणी करावी.
Read More
कांद्याचे बाजारभाव ; चालू आठवड्यात कांद्याला काय बाजारभाव मिळतोय पहा.
कांद्याचे बाजारभाव ; चालू आठवड्यात कांद्याला काय बाजारभाव मिळतोय पहा.
Read More
Panjab dakh rain update ; आज पासून जोरदार पाऊस, हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज.
Panjab dakh rain update ; आज पासून जोरदार पाऊस, हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज.
Read More
डॉ. रामचंद्र साबळे अंदाज ; २२ ते २९ ऑक्टोबरचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला.
डॉ. रामचंद्र साबळे अंदाज ; २२ ते २९ ऑक्टोबरचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला.
Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीची (e-KYC) अट तूर्तास रद्द.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीची (e-KYC) अट तूर्तास रद्द.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया सरकारने तूर्तास थांबवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, योजनेतील महिलांची नाराजी वाढू नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पडताळणी मोहीम आणि नाराजीचे कारण

विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ‘गेम चेंजर’ ठरलेल्या या योजनेमुळे सत्ता पुन्हा महायुतीकडे आली होती. मात्र, आता या योजनेत अपात्र लाभार्थींची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आल्याने सरकारने पडताळणी मोहीम सुरू केली होती. त्यानुसार e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले होते. या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नाराजी वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. याच कारणामुळे सरकारने e-KYC पडताळणी प्रक्रिया तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेची सुरुवात आणि सध्याची स्थिती

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपयांचा हप्ता जमा केला जातो. योजनेच्या सुरुवातीला तब्बल २ कोटी ५६ लाख महिलांनी अर्ज केले होते आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व अर्जांना मान्यता देण्यात आली होती.

Leave a Comment