Mera Ration New card ; नवीन स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरु.
Mera Ration New card ; नवीन स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरु.
Read More
पीएम-किसान योजना ; अपनी किस्त पाने के लिए दस्तावेजों को जल्द सुधारें
पीएम-किसान योजना ; अपनी किस्त पाने के लिए दस्तावेजों को जल्द सुधारें
Read More
पंजाब डख म्हणतात राज्यात आजपासून पावसाला सुरुवात, दररोज भाग बदलत पाऊस.
पंजाब डख म्हणतात राज्यात आजपासून पावसाला सुरुवात, दररोज भाग बदलत पाऊस.
Read More
गेहूं की ये टॉप 3 किस्में बदलते मौसम में भी देंगी बंपर पैदावार, जानें अन्य
गेहूं की ये टॉप 3 किस्में बदलते मौसम में भी देंगी बंपर पैदावार, जानें अन्य
Read More

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार ई-केवायसीला लावला ब्रेक.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार ई-केवायसीला लावला ब्रेक.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली होती. या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत याच लाडक्या बहिणींची नाराजी महायुतीला परवडणारी नाही, हे लक्षात घेऊन सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेली लाभार्थी महिलांच्या ‘ई-केवायसी’ (e-KYC) ची प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात आली आहे. तसेच, लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात त्वरित वितरित केला जाणार आहे.

योजनेची पार्श्वभूमी आणि लाभार्थी संख्या

राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. २८ जून २०२४ रोजी या योजनेला मान्यता मिळाली आणि जुलै २०२४ पासून लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला ₹१५०० चा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ च्या मुदतीपर्यंत २ कोटी ५६ लाख महिलांनी अर्ज केले होते.

पडताळणी आणि अपात्रतेचे आव्हान

योजनेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर, सरकारने निकषांवर बोट ठेवत लाभार्थींची पडताळणी सुरू केली. या पडताळणीनंतर राज्यातील जवळपास ४५ लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. आता ‘ई-केवायसी’च्या माध्यमातून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या उत्पन्नाच्या निकषानुसार राज्यभरातील ७० लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याउलट, निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही, त्यामुळे त्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.

Leave a Comment