राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
Read More
Tur bajarbhav ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Tur bajarbhav ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Read More
शेतकऱ्यांना खुशखबर आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार नवीन निर्णय.
शेतकऱ्यांना खुशखबर आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार नवीन निर्णय.
Read More
Kanda price 18 October ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव.
Kanda price 18 October ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव.
Read More

दिवाळीपूर्वी मदत वाटपाचे आश्वासन; १३ जिल्ह्यांच्या याद्या जाहीर

दिवाळीपूर्वी मदत वाटपाचे आश्वासन; १३ जिल्ह्यांच्या याद्या जाहीर

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, १३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी तब्बल १३५६ कोटी रुपयांच्या मदतनिधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याने सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मदतीच्या निधीमध्ये वाढ

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने यापूर्वी २२१५ कोटी आणि त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी ४९० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. आता पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय काढून १३ जिल्ह्यांसाठी १३५६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नुकसान भरपाईचे सुधारित दर

शासनाच्या निर्णयानुसार, ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे आणि मदतीचे दर खालीलप्रमाणे आहेत:

जिरायती पिकांसाठी: प्रति हेक्टर १८,५०० रुपये
पारंपरिक फळबागांसाठी: प्रति हेक्टर २७,००० रुपये
फळबाग लागवडीसाठी: प्रति हेक्टर ३२,५०० रुपये

Leave a Comment