Maharashtra rain update ; महाराष्ट्रातून मॉन्सून परतीच्या मार्गावर हवामान खात्याचा अंदाज.
Maharashtra rain update ; महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ झाली असून, आजपासून शनिवारपर्यंत (१२ ते १८ ऑक्टोबर) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने अत्यंत कमी प्रमाणात येतील.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
परिणामी, पश्चिम विदर्भात हवामान पूर्णपणे उघडीप राहून पावसाची कोणतीही शक्यता नाही. तसेच धुळे, जळगाव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही आज (१२ ऑक्टोबर) पाऊस अपेक्षित नाही. मध्य आणि पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता कमी आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
संपूर्ण महाराष्ट्रात ढगांचे प्रमाणही अत्यल्प राहील. यामुळे सूर्यप्रकाश चांगला मिळून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील आणि वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. हवामानाची वाटचाल अस्थिरतेकडून स्थिरतेकडे होत आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
मॉन्सूनची माघार आणि थंडीची चाहूल
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून काश्मीर, पंजाब, हरियाना, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतून तसेच पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशातून बाहेर पडला आहे. भारताच्या पूर्व भागातून उत्तरेकडून दक्षिणेकडे ईशान्य मॉन्सून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. हवेच्या दाबात झालेल्या वाढीमुळे मॉन्सून आता वेगाने माघार घेण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सध्याचे हवामान अत्यंत अनुकूल बनले आहे. तसेच, किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, थोड्याच दिवसांत थंडीची चाहूल जाणवू लागेल.
जागतिक हवामान घटकांचा प्रभाव
प्रशांत महासागरात पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान केवळ १४ अंश सेल्सिअस असून, इक्वेडोरजवळ ते २१ अंश सेल्सिअस असल्याने पाणी थंड आहे. यामुळे तिकडे हवेचे दाब अधिक आहेत, म्हणजेच ‘ला-निना’चा प्रभाव अद्याप कायम आहे. याउलट, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती होत असून, परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी अधिक वेळ लागत आहे.
विभागांनुसार आजचा (१२ ऑक्टोबर) हवामान अंदाज
कोकण.
पाऊस: आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत ६ मि.मी., तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
वारे:सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील.
तापमान: कमाल तापमान सिंधुदुर्ग, रायगड व पालघरमध्ये ३२ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व ठाण्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरीमध्ये २३ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस आणि ठाण्यात २५ अंश सेल्सिअस राहील.
आर्द्रता व आकाश: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर उर्वरित जिल्ह्यांत अल्पसे ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत ८५ ते ९० टक्के, तर रायगड, ठाणे व पालघरमध्ये ७४ ते ७७ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र.
पाऊस: आज नाशिक जिल्ह्यांत ३ मि.मी. आणि नंदुरबार जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यांत पाऊस अपेक्षित नाही.
वारे: नाशिक व जळगावात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, तर धुळे व नंदुरबारमध्ये आग्नेयेकडून राहील. ताशी वेग २ ते ४ कि.मी. राहील.
तापमान: कमाल तापमान नाशिकमध्ये ३१ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबारमध्ये ३२ अंश सेल्सिअस आणि जळगावात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबारमध्ये १८ अंश सेल्सिअस, तर नाशिक व जळगावात १९ ते २० अंश सेल्सिअस राहील.
आर्द्रता व आकाश: सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के, तर दुपारची ४० टक्के राहील.
मराठवाडा
पाऊस: आज लातूर व नांदेड जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी., परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३ मि.मी., तर बीड व धाराशिव जिल्ह्यांत २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.
वारे:सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग बीड व छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ कि.मी., नांदेडमध्ये ४ कि.मी., बीडमध्ये ६ कि.मी., हिंगोली, लातूर व जालनामध्ये ७ कि.मी. आणि धाराशिवमध्ये १० कि.मी. राहील.
तापमान: कमाल तापमान छत्रपती संभाजीनगरमध्ये ३० अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीडमध्ये ३१ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व जालनामध्ये कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव व बीडमध्ये १८ अ…