राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
Read More
Tur bajarbhav ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Tur bajarbhav ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Read More
शेतकऱ्यांना खुशखबर आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार नवीन निर्णय.
शेतकऱ्यांना खुशखबर आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार नवीन निर्णय.
Read More
Kanda price 18 October ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव.
Kanda price 18 October ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव.
Read More

रब्बी हंगामात हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा संपूर्ण माहिती

रब्बी हंगामात हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा संपूर्ण माहिती.

रब्बी हंगामात हरभरा आणि गहू यांसारख्या पारंपरिक पिकांऐवजी कमी वेळेत, कमी खर्चात आणि वन्यप्राण्यांच्या त्रासाशिवाय चांगले उत्पादन देणाऱ्या पिकाच्या शोधात अनेक शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी राजमा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राजमा पिकाची योग्य माहिती घेऊन लागवड केल्यास शेतकरी सहजपणे एकरी नऊ ते अकरा क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतात. हे पीक अवघ्या ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांत काढणीला तयार होते.

राजमा लागवडीचे महत्त्वाचे फायदे

राजमा लागवडीचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे वन्यप्राण्यांपासून पिकाचे होणारे संरक्षण. रानडुक्कर, हरीण, नीलगाय किंवा ससे यांसारखे प्राणी हे पीक खात नाहीत. त्यामुळे ज्या भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठा आहे, तेथील शेतकऱ्यांसाठी हे पीक एक प्रकारचे वरदान ठरू शकते.

यासोबतच, हे पीक पेरणीपासून केवळ ८० ते ८५ दिवसांत काढणीला तयार होत असल्याने शेतकऱ्यांना कमी वेळेत नगदी उत्पन्न मिळते. बाजारात राजमाला सरासरी ९,००० ते १०,००० रुपये प्रति क्विंटल असा स्थिर भाव मिळतो, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते. (तरीही, मागील वर्षाच्या शेवटी शेवटी दरांमध्ये काही प्रमाणात घसरण झाली होती.)

आधुनिक तंत्रज्ञान आणि खर्चात बचत

या पिकाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे मजुरी खर्चात होणारी लक्षणीय बचत. पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी खुरपणीची गरज नसते, कारण बाजारात उपलब्ध तणनाशकांची फवारणी करून तणनियंत्रण करणे शक्य होते. तसेच, काढणीसाठी मळणी यंत्राचा (थ्रेशर) वापर करता येत असल्याने काढणीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो. या पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने कमी असतो, परिणामी कीटकनाशकांवरील खर्चही मर्यादित राहतो.

Leave a Comment