मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.
मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.
Read More
Ladki bahin kyc ; लाडकी बहीण योजना kyc अशी करा.
Ladki bahin kyc ; लाडकी बहीण योजना kyc अशी करा.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
पंजाब डख हवामान अंदाज ; दिवाळीत पाऊस येणार का? पहा काय म्हणतात पंजाब डख.
पंजाब डख हवामान अंदाज ; दिवाळीत पाऊस येणार का? पहा काय म्हणतात पंजाब डख.
Read More

Ladki bahin kyc process ; लाडकी बहीण केवायसी नवीन घोषणा, शेवटची तारीख.

Ladki bahin kyc process ; लाडकी बहीण केवायसी नवीन घोषणा, शेवटची तारीख.

Ladki bahin kyc process ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत लाभार्थ्याचे आधार कार्ड, तसेच पती किंवा वडिलांचे आधार कार्ड ओटीपीद्वारे प्रमाणित (व्हेरिफिकेशन) केले जात आहे. याव्यतिरिक्त, कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का, महिलेचा जात प्रवर्ग कोणता आहे आणि एका घरात दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत का, अशी सर्व माहिती या केवायसी प्रक्रियेतून गोळा केली जात आहे. ही प्रक्रिया २० सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली आणि जीआरनुसार पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश होते.

2) केवायसी मुदतवाढ आणि त्याची कारणे.

राज्यात गेल्या महिनाभरापासून असलेली पावसाची आणि पूरस्थिती, तसेच योजनेच्या पोर्टलवरील ओटीपी त्रुटी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. या पार्श्वभूमीवर, अतिवृष्टी बाधित तालुके आणि जिल्ह्यांतील महिला भगिनींना आता केवायसी करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. याचा अर्थ, जी तारीख साधारणपणे २० नोव्हेंबरपर्यंत होती, ती आता ५ डिसेंबर किंवा त्यानंतरही वाढू शकते. पुढील वर्षापासून जून महिन्यात दोन महिन्यांच्या कालावधीत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

3) केवायसी केली तरी अपात्र लाभार्थींना मिळणार नाही लाभ.

केवायसी केल्यानेच पैसे मिळणार किंवा अपात्र महिला पात्र होणार, याबद्दल अनेक संभ्रम आहेत. परंतु, केवायसी केवळ पारदर्शकता आणण्यासाठी आहे. निकषांमध्ये न बसणारे लाभार्थी, त्यांनी चुकीच्या पद्धतीने केवायसी केली तरी ते अपात्रच राहणार आहेत. पूर्वी पडताळणीमध्ये आलेल्या २६ लाख अर्जांपैकी २२ लाख अर्ज पात्र ठरले आहेत आणि उर्वरित ४ लाख अर्जांची पडताळणी सुरू आहे. ज्यांचे हप्ते बंद होते, त्यांनी केवायसी केल्यावर ते पात्र ठरले असल्यास त्यांचे थकीत हप्ते देण्यात आले आहेत.

4) पती/वडिलांच्या आधारकार्डची अडचण असलेल्या महिलांची समस्या

ज्या महिलांचे पती मयत आहेत, घटस्फोटित आहेत किंवा ज्यांचे पती/वडिलांशी पटत नाही, अशा महिलांसाठी केवायसी करताना मोठी अडचण येत आहे. कारण या प्रक्रियेत पती किंवा वडिलांच्या आधार कार्डाचे ओटीपी व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यातही तांत्रिक त्रुटी येत आहेत. यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment