हवामान अभ्यासक पंजाब डख ; जोरदार वादळी पाऊस, या तारखेपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम.
हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात २५ ऑक्टोबरपासून ते २८ ऑक्टोबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यात एकाच वेळी नसेल, तर तो भाग बदलत पडणार आहे. तरीही, या चार दिवसांत पडणारा पाऊस हा पावसाळ्यातील शेवटचा पाऊस असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे…
हा पाऊस प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, आणि उत्तर महाराष्ट्र या चार विभागांमध्ये जास्त प्रमाणात असेल. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे तसेच संपूर्ण कोकणपट्टी या भागांमध्ये आज रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह शक्यता आहे. या तुलनेत पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये पाऊस असला तरी त्याचे प्रमाण कमी असेल आणि तो केवळ भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडेल.
या तारखेपासून हवामान कोरडे
शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे २८ ऑक्टोबरनंतर राज्यात हवामान कोरडे होणार आहे. २९ ऑक्टोबर पासून राज्यात सूर्यदर्शन होईल आणि पाऊस पूर्णपणे थांबेल.
















