हरभरा पिकासाठी पेरणीनंतर आणि उगवण झाल्यावर योग्य तणनाशके कोणते पहा.
शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर पिकात योग्य तणनाशकाचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. हरभरा उगवल्यानंतर २०-२५ दिवसांच्या आसपास वापरण्यासाठी लेबल क्लेम (अधिकृतपणे मंजूर) केलेले कोणतेही तणनाशक सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे, हरभऱ्यामध्ये तण नियंत्रणासाठी प्रामुख्याने पेरणी करून झाल्या झाल्या ४८ तासांच्या आत ‘प्री-इमर्जन्स’ (उगवणपूर्व) तणनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
उगवणपूर्व तणनाशकाचे पर्याय:
हरभरा पेरणीनंतर ४८ तासांच्या आत वापरण्यासाठी बाजारात काही प्रभावी तणनाशके उपलब्ध आहेत:
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
1.सुमिटोमो कंपनीचे ‘एक मॅक्स’: हे तणनाशक १०० मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणीसाठी वापरले जाते. 2.आदमा कंपनीचे ‘एलिस’: हे सुद्धा एक नवीन आणि प्रभावी तणनाशक आहे. याचा वापर १२०० मिली प्रति एकर या प्रमाणात करू शकता.
या दोन्ही तणनाशकांचा वापर केल्यानंतर जमिनीवर एक थर तयार होतो, जो गवत किंवा तणांचे अंकुरण थांबवतो. फवारणी करताना शक्यतो उलटे चालत जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जमिनीवर तयार झालेला तणनाशकाचा थर तुटणार नाही.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पेन्डामेथिलीन आधारित तणनाशके:
वरील पर्यायांव्यतिरिक्त, तुम्ही पेन्डामेथिलीन (Pendimethalin) ३८.७% घटक असलेले कोणत्याही कंपनीचे तणनाशक वापरू शकता. उदा. दोस्त सुपर किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा. याचा वापर ७०० मिली प्रति एकर या प्रमाणात ४८ तासांच्या आत करणे आवश्यक आहे. ही औषधे महिनाभरापर्यंत हरभरा पिकामध्ये तण उगवू देत नाहीत.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
प्रायोगिक तत्वावर वापरले जाणारे उगवणपश्चात तणनाशक:
हरभरा २०-२५ दिवसांचा झाल्यावर अनेक शेतकरी स्वतःच्या जबाबदारीवर प्रायोगिक तत्वावर एका तणनाशकाचा वापर करतात. पीआय कंपनीचे ‘एलियट’ किंवा बीएसएफ कंपनीचे ‘टिंजर’, तसेच ‘टोपमीझोन’ (Topramezone) हा घटक असलेले कोणतेही तणनाशक शेतकरी २० मिली प्रति एकर या प्रमाणात वापरतात. काही शेतकऱ्यांना याचा चांगला परिणाम मिळाला आहे, तण १००% मरते; परंतु काही शेतकरी सांगतात की हरभऱ्याला थोडा ‘शॉक’ बसतो आणि कधीकधी जास्त फुटवे झालेले देखील दिसून येतात. हे तणनाशक कोणत्याही कंपनीचा अधिकृत ‘लेबल क्लेम’ नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवरच हा प्रयोग करावा.