हरभरा एकरी 21 क्विंटल निघणार हे वाण पेरा पंजाब डख.
हरभरा एकरी 21 क्विंटल
हरभरा लागवड, वाण आणि व्यवस्थापन माहिती…हरभऱ्याची लागवड कशी करावी आणि त्यातून जास्त उत्पादन (सरासरी १६ क्विंटल आणि काही ठिकाणी २१ क्विंटलपर्यंत) कसे मिळवावे, याबद्दल पंजाब डख यांनी मार्गदर्शन केले आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
1) हरभऱ्याचे वाण आणि बियाणे प्रमाण.
वाण (Variety): हरभऱ्यासाठी ९२१८ (JAKI 9218) आणि विजय हे वाण महाराष्ट्रातील जमिनींसाठी चांगले आहेत. असं पंजाब डख यांनी सांगितले आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पेरणीचे अंतर: १८ इंच अंतरावर पेरणी करावी, ज्यामुळे चांगले उत्पादन येते.
बियाणे प्रमाण: पारंपारिक २५ किलो प्रति एकर बियाणे वापरण्याऐवजी, एकरी ४० ते ४५ किलो बियाणे वापरावे. हरभरा इतका दाट असावा की त्यावर प्लेट फेकल्यास ती तरंगेल असं ही डख यांनी सांगितले आहे.
2) खत नियोजन
खत व्यवस्थापनामध्ये डीएपी (DAP) ची एक बॅग द्यावी.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
त्यासोबत ५ किलो गंधक (Sulphur) वापरावे, ज्यामुळे हरभरा चांगला राहतो.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
3) पेरणीची काळजी आणि जुनी पद्धत
पेरणीची खोली: हरभरा पेरताना ट्रॅक्टर चालकाला 100,200 शिल्लक देऊन हरभरा खोल पेरायला सांगावे.
चिबड्या जमिनीतील पद्धत: ज्यांच्या जमिनी वापसा होत नसल्याने चिबड्या राहतात, त्यांनी हरभरा फेकून द्यावा आणि नंतर जनावरं (बैल) त्यावरून तुडवावीत. बैलांच्या खुरांमुळे हरभरा जमिनीत जातो आणि पाऊस हडकला की तो चांगला उगवतो. पूर्वीचे लोक या पद्धतीने चांगले उत्पन्न घेत असाचे असं ही पंजाब डख यांनी सांगितले आहे.
4) पाणी व्यवस्थापन (पाणी देण्याची वेळ)
मोकळे पाणी देऊ नका: हरभऱ्याला मोकळे पाणी अजिबात देऊ नये.
पहिले पाणी: पेरणी केल्याच्या दुसऱ्या दिवशी तुषार सिंचनाने (Sprinkler) फक्त दोन तासच पाणी द्यावे. दुसरे पाणी: 20 दिवसांनी चार तासांसाठी द्यावे.
तिसरे पाणी: 40 दिवसांनी सहा तासांसाठी द्यावे. 40 दिवसांनी हरभऱ्याला फुले लागण्यास सुरुवात होते.
महत्त्वाची सूचना: हरभऱ्याला फुले लागल्यानंतर कधीच पाणी देऊ नये. फुले लागल्यावर पाणी दिल्यास ती गळून जातात (फुलं गळतात), ज्यामुळे उत्पादनात घट होते असं पंजाब डख यांनी सांगितले आहे.