गेहूं की ये टॉप 3 किस्में बदलते मौसम में भी देंगी बंपर पैदावार, जानें अन्य
गेहूं की ये टॉप 3 किस्में बदलते मौसम में भी देंगी बंपर पैदावार, जानें अन्य
Read More
Soyabin bajarbhav ; आजचे 23 ऑक्टोबर चे सोयाबीन बाजारभाव पहा.
Soyabin bajarbhav ; आजचे 23 ऑक्टोबर चे सोयाबीन बाजारभाव पहा.
Read More
तूर पिकाला कळी अवस्थेत यशस्वी फवारणी कोणती करावी.
तूर पिकाला कळी अवस्थेत यशस्वी फवारणी कोणती करावी.
Read More
Kanda bajarbhav Maharashtra ; राज्यातील आजचे 23 ऑक्टोबरचे कांदा बाजारभाव.
Kanda bajarbhav Maharashtra ; राज्यातील आजचे 23 ऑक्टोबरचे कांदा बाजारभाव.
Read More

सोयाबीन हमीभावाने लवकरच खरेदी सुरू होणार ; शेतकऱ्यांनो सोयाबीन विक्रची घाई करू नका.

सोयाबीन हमीभावाने लवकरच खरेदी सुरू होणार ; शेतकऱ्यांनो सोयाबीन विक्रची घाई करू नका.

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नाफेडने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना लवकरच शासकीय हमीभावाने सोयाबीनची विक्री करता येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची शासकीय खरेदी ₹५,३२८ प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर सुरू होण्याची शक्यता आहे.

आमदार सावरकर यांचे शेतकऱ्यांसाठी आवाहन

अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सोयाबीनची कमी भावाने विक्री न करता, शासनाच्या खरेदीची प्रतीक्षा करण्याचे सांगितले आहे. या शासकीय खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य आणि विश्वसनीय दर मिळण्याची संधी उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांचे खुल्या बाजारातील कमी भावामुळे होणारे नुकसान टळेल.

तातडीने खरेदी सुरू करण्यासाठी प्रयत्न

सोयाबीन खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी, यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाच्या उच्चस्तरीय नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह नाफेडचे महाव्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आहे. याचबरोबर, खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी चर्चा करून खरेदी प्रक्रियेच्या मंजुरीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Leave a Comment