सोयाबीन विकू नका, सोयाबीन 5328₹ भाव..सरकार सगळ्यांच सोयाबीन घेनार.
सोयाबीन उत्पादकांना दिलासा देत हमीभावान खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २४) माध्यमांशी बोलताना सोयाबीन खरेदीविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार राज्यात कापूस आणि सोयाबीनची खरेदी सुरु करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३० ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर हमीभावाने खरेदी सुरु होईल. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने कमी भावात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
“शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच जे शेतकरी हमीभावाने आले सोयाबीन विकू इच्छितात त्या सर्वांचे सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. राज्य सरकार, पणन विभाग, नाफेड आणि केंद्र सरकारने राज्यात खरेदीचे जाळे निर्माण केले आहे.




 
		
















