राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
Read More
Tur bajarbhav ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Tur bajarbhav ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Read More
Kanda price 18 October ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव.
Kanda price 18 October ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव.
Read More
सोयाबीन बाजारभाव ; आजचे 18 ऑक्टोबरचे सोयाबीन बाजारभाव
सोयाबीन बाजारभाव ; आजचे 18 ऑक्टोबरचे सोयाबीन बाजारभाव
Read More

शेतकऱ्यांना खुशखबर आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार नवीन निर्णय.

शेतकऱ्यांना खुशखबर आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार नवीन निर्णय.

जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रलंबित प्रकरणे या निर्णयामुळे मार्गी लागतील. महसूल मंत्री पद मिळवल्यापासून बावनकुळे यांनी धडाधडा निर्णय घेतले आहे. या निर्णायामुळे जनतेला मोठा फायदा होत आहे. त्यांच्या निर्णयाचे आणि अंमलबजावणीचे सध्या राज्यात कौतुक सुरू आहे. याविषयीची अधिसूचनाही सरकारने जारी केली आहे.

पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक असते. मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे कोट्यवधी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारची अधिसूचना जारी.

राज्यात पोटहिस्सा कायम करणे, गुंठेवारी मोजणी प्रकरण, जमीन संपादन मोजणी प्रकरण, नगर भूमापन, वन मोजणी, गावठाण व बाहेरील सीमेलगतच्या जमिनींचे स्वामित्व देण्याची योजना आहे. प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना आहे. प्रॉपर्टी कार्ड व सीमांकनासाठी आवश्यक मोजणी प्रकरणाला ९० ते १२० दिवस लागत आहेत. त्याचा विचार शासनाने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याचा अभ्यास करायला सांगितले.

Leave a Comment