लाडक्या बहिणींनो तुमची kyc झाली का अशी करा चेक पहा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, सर्वप्रथम योजनेच्या मुखपृष्ठावर दिलेल्या ई-केवायसी बॅनरवर क्लिक करून फॉर्म उघडावा लागतो.
या फॉर्ममध्ये, लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि दिलेला पडताळणी संकेतांक (कॅप्चा कोड) अचूकपणे भरावा. त्यानंतर, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन ‘सेंड ओटीपी’ या बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे. असे केल्यावर, लाभार्थ्याच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी प्राप्त होतो. तो ओटीपी नमूद करून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करावे.
यानंतर, प्रणालीद्वारे अर्जदाराची केवायसी यापूर्वीच पूर्ण झाली आहे की नाही, याची तपासणी केली जाते. जर ती पूर्ण झाली असेल, तर स्क्रीनवर तसा संदेश दर्शवला जातो.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
जर केवायसी पूर्ण झालेली नसेल, तर अर्जदाराचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे तपासले जाते. आधार क्रमांक पात्र यादीत आढळल्यास, अर्जदाराला प्रक्रियेच्या पुढील टप्प्यावर जाता येते.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पुढील टप्प्यात, लाभार्थ्याला आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि संबंधित पडताळणी संकेतांक (कॅप्चा कोड) टाकावा लागतो. यानंतर संमती देऊन ‘सेंड ओटीपी’ बटणावर क्लिक करावे. संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून ‘सबमिट’ करावे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
त्यानंतर, अर्जदाराला स्वतःचा जात प्रवर्ग निवडून काही महत्त्वाच्या बाबी प्रमाणित कराव्या लागतील. यामध्ये, ‘माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत कायम कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक नाही’ आणि ‘माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे’ या विधानांना संमती देण्यासाठी चेक बॉक्सवर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘सबमिट’ बटण दाबावे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, स्क्रीनवर ‘तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश प्रदर्शित होतो.