रामचंद्र साबळे अंदाज ; राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट आणि चक्रीवादळाची ताजी अपडेट.?
प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, सध्या राज्यात हवामानातील बदलांमुळे पावसाची शक्यता वाढली आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
आज आणि उद्या २०,२१ ऑक्टोबर महाराष्ट्रावरील हवेचा दाब कमी होऊन तो १००६ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे सर्व जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. ज्या भागांमध्ये हवेचा दाब कमी राहील, तिथे मोठ्या प्रमाणात ढग जमा होऊन पावसाची शक्यता निर्माण होईल.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अतिथंड झाले आहे, ज्यामुळे पेरूजवळ ते केवळ १४ अंश सेल्सिअस तर इक्वाडोरजवळ २१ अंश सेल्सिअस इतके कमी आहे. यामुळे तेथे हवेच्या दाबात वाढ झाली आहे. वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असल्याने दक्षिण भारतावर मोठ्या प्रमाणात ढग जमा झाले आहेत. ‘ला-निना’च्या परिणामाने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आज व उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.राहील.
मंगळवारपासून शनिवारपर्यंत (२१ ते २५ ऑक्टोबर) हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१० हेप्टापास्कलपर्यंत पोहोचेल. या वाढलेल्या हवेच्या दाबामुळे वाऱ्याला प्रतिबंध होईल, परिणामी दिवाळीत पावसाची शक्यता कमी राहील, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
चक्रीवादळाची आणि बाष्पनिर्मितीची स्थिती
सध्या हिंदी महासागराचे आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती सुरू असून, ढगांचा मोठा समूह हिंदी महासागरावर व बंगालच्या उपसागरावर जमला आहे, जो दक्षिण भारताच्या दिशेने येत आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
आज (१९ ऑक्टोबर) विषुववृत्तीय भागात चक्रीवादळाची निर्मिती होऊन ते वादळ अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने गुरुवारी (२३ ऑक्टोबर) पुढे जाईल. हवामान बदलाचे असे परिणाम नोव्हेंबरपर्यंत जाणवतील, असा अंदाज साबळे यांनी दिला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
हिवाळ्याचा अंदाज
दिवसेंदिवस हवामान बदलाचे परिणाम वाढत आहेत. या वर्षी हिमालयात अधिक बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या काळात अतितीव्र थंड हवामान जाणवेल. याच काळात अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहतील, अशी माहिती साबळे यांनी दिली आहे.