राज्यात पाऊस कधी उघडणार? पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा पाऊस सर्वदूर नसला तरी काही भागांमध्ये पडेलच. सध्या हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे अधिक आहे आणि पुढील एक-दोन दिवस तिकडेच प्रमाण जास्त राहील. त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे देखील काही ठिकाणी पाऊस पडेल.
२७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यानची परिस्थिती:
राज्यात सध्या १ नोव्हेंबरपर्यंत पाऊस कायम असणार आहे. पाऊस सर्व ठिकाणी सारखा पडणार नाही, तर भाग बदलत पडेल, कुठे कमी, कुठे जास्त, तर काही ठिकाणी वगळून देखील जाऊ शकतो. १ नोव्हेंबरनंतर २ आणि ३ तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी होईल आणि त्यानंतर काही ठिकाणी थंडीला सुरुवात होईल. दोन चक्रीवादळे येऊन गेल्यामुळे त्याचा काही प्रमाणात परिणाम मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरमधील हवामान आणि थंडी:
नोव्हेंबर महिन्यात थंडी असणार आहे, परंतु अवकाळी पावसाचे वातावरण अधूनमधून तयार होऊ शकते. त्यामुळे या महिन्यात देखील वातावरण थोडे खराब होण्याची शक्यता आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून, दोन कमी दाबाचे पट्टे चक्रीवादळात रूपांतरित झाल्यामुळे पडत आहे. हा पाऊस नक्की कुठे पडेल, याचे स्वरूप कसे राहील हे निश्चित सांगता येत नाही.




















