मोंथा चक्रीवादळाची तिव्रता वाढन्याची शक्यता, महाराष्ट्राच्या या भागावर होनार परिणाम.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीतून आता चक्रीवादळ तयार झालं असून, त्याला ‘मोंथा’ या नावानं ओळखलं जाईल.महाराष्ट्रावर या वादळाचा कसा परिणाम होईल? हेही आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
तर मोंथा हे थायलंडनं सुचवलेलं नाव असून, त्याचा अर्थ होतो ‘सुंदर आणि सुवासिक फुल’.
पुढच्या 24 तासांत मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, 27 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
28 ऑक्टोबरला भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशात काकीनाडाजवळ मछलीपट्टणम-आणि कलिंगपट्टणमदरम्यान हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे, पण त्याचा परिणाम महाराष्ट्रात विदर्भाच्या काही भागांतही जाणवू शकतो.
किनाऱ्यावर धडकल्यानतंर हे चक्रीवादळ विदर्भालगत छत्तीसगडच्या दिशेनं वर सरकू शकतं. विशेषतः विदर्भाच्या पूर्वेकडील भागांत यामुळे वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात मोंथा चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकताना ताशी 90-100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि काही वेळा वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी 110 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
एखाद्या चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 88-117 किमीपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याला सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळ म्हटलं जातं.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
मोंथा चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग पाहता, पुढचे 5 दिवस बंगालच्या उपसागरात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
उत्तर हिंद महासागर क्षेत्रात म्हणजे भारतीय उपखंडाच्या आसपासच्या परिसरात साधारणपणे नैऋत्य मान्सून येण्याआधीच्या काळात आणि नैऋत्य मान्सूननं माघार घेतल्यानंतरच्या काही आठवड्यांत चक्रीवादळं तयार होतात.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
मोंथा चक्रीवादळ हे यंदाच्या मोसमातलं आणि यंदाच्या वर्षातलं दुसरं चक्रीवादळ आहे. याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ तयार झालं होतं.
बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात आलेल्या कमी दाबाच्या प्रणालीनं 29 सप्टेंबरनंतर पुन्हा अरबी समुद्रात प्रवेश केला होता आणि त्यातूनच शक्ती चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.
अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र
अरबी समुद्रातलं डिप्रेशन म्हणजे कमी दाबाची तीव्र प्रणाली अजूनही कायम आहे. 22 ऑक्टोबरला हे वादळ तयार झालं होतं आणि अजूनही ते रेंगाळतंय.
या डिप्रेशनच्या प्रभावामुळे कोकण आणि घाट प्रदेशात अनेक ठिकाणी गेल्या 24 तासांत वादळी वारा, विजा आणि गडगडटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली.