दक्षिण भारतात घोंगावणाऱ्या ‘माेंथा’ चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे मोठे संकट ओढवले आहे. या वादळाचा विदर्भालाही जोरदार तडाखा बसला असून, बुधवारी रात्री विदर्भातील बहुतांश भागांत अवकाळीच्या मुसळधार सरी कोसळल्या. गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक होती. गुरुवारी दिवसा पावसाचा जोर काहीसा मंदावला असला, तरी दिवसभर रिपरिप आणि रिमझिम सुरूच राहिली. ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या ‘माेंथा’ चक्रीवादळाची सक्रियता आता दक्षिण भारताच्या तामिळनाडू किनारपट्टीकडे वळली आहे. या प्रभावामुळे विदर्भात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस म्हणजे २ नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचे हे सावट कायम राहणार आहे. पहिल्या दोन दिवसांत ढगांनी शांतता बाळगली, पण बुधवारी रात्री जोरदार सरी कोसळल्या. गडचिरोलीत सर्वाधिक ७२.२ मि.मी., चंद्रपूरमध्ये ६६ मि.मी., तर अमरावतीत ५९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय, वर्धा (३१ मि.मी.), भंडारा (२७ मि.मी.), यवतमाळ (२० मि.मी.), बुलढाणा (१४ मि.मी.), अकोला (१३.३ मि.मी.), आणि नागपूरमध्ये (१०.८ मि.मी.) पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा भागात ८२.९ मि.मी. तर नागपूर जिल्ह्यात कामठी तालुक्यात २३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
गुरुवारी सकाळपासूनच रिपरिप सुरू होती आणि थांबून थांबून दिवसभर पावसाचे सत्र सुरू राहिले. रात्रीही पावसाची संततधार कायम होती.
या अवकाळीच्या तडाख्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या धान उत्पादक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या काळात धानाचे लोंब पूर्ण भरलेले असतात आणि दिवाळीनंतर कापणी व मळणीची लगबग सुरू असते. पावसामुळे शेतातील धान जमिनीवर आडवा झाला आहे. माती मिसळल्यामुळे धानाच्या लोंब्यांमध्ये पुन्हा अंकुरण सुरू झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला धान बांधणीपूर्वीच भिजल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. पाण्यात भिजलेल्या या धानाची गुणवत्ता घसरून तो ‘पाखड’ (खराब) होण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टरवरील धानाचे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या पावसामुळे कापलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धान अंकुरले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही पीक आडवी झाली असून, कापून बांधात ठेवलेला धान पूर्णपणे भिजला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
इतर पिकांनाही मोठा फटका: संत्रा, कापूस आणि भाजीपाल्याचे नुकसान.
कापूस उत्पादक पट्ट्यातही अशीच गंभीर स्थिती आहे. हजारो हेक्टरमधील कापूस खराब होण्याची भीती आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी कापूस काळवंडला असून, त्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिक गडद झाले आहे. संत्रा आणि मोसंबी उत्पादकही संकटात सापडले आहेत, कारण आंबिया बहाराची प्रचंड नासधूस झाली आहे. यासोबतच, अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसत आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
ऐन कापणीच्या टप्प्यात हे नैसर्गिक संकट कोसळल्याने विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. लाखो हेक्टरमधील धानाची ‘माती’ होण्याची भीती असून, रब्बी हंगामही लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.