पुढील ५ दिवस राज्यात हवामान कसे राहणार? विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता.
१.हवामानातील बदल आणि कमी दाबाचे क्षेत्र
राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ‘मोंथा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर, उत्तर छत्तीसगड परिसरात ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली उत्तर-ईशान्येकडे वाटचाल करत सध्या झारखंडच्या वायव्य भागात आहे. पुढे ही प्रणाली उत्तर-वायव्येकडे वाटचाल करत पुढील १२ तासांत बिहार ओलांडून तिची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
२.आजचा (शुक्रवार) पावसाचा अंदाज
आज (शुक्रवार) राज्यातील काही भागांत ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
विदर्भ: बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि कोकण: छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, तसेच रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र: जालना, परभणी, हिंगोली, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
३.शनिवार आणि रविवारचा अंदाज.
उद्या (शनिवार) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. रविवारी मराठवाडा आणि नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
४.सोमवारचा अंदाज (पुढील आठवड्याची सुरुवात)
सोमवारी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील पाच दिवसांत या हवामानाचा अंदाज घेऊन शेतीची कामे आणि काढणीचे नियोजन करावे.