पंजाब डख म्हणतात चक्रीवादळ महाराष्ट्रातून जानार राज्यात एवढे दिवस मुसळधार पाऊस.
पंजाब डख म्हणतात चक्रीवादळ महाराष्ट्रातून जानार राज्यात एवढे दिवस मुसळधार पाऊस.
Read More
चक्रीवादळाचे अवशेष विदर्भातून प्रवास करणार; कोकण, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार.
चक्रीवादळाचे अवशेष विदर्भातून प्रवास करणार; कोकण, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार.
Read More
कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा आज कांद्याचे गणित बिगडले पहा आजचे बाजारभाव.
कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा आज कांद्याचे गणित बिगडले पहा आजचे बाजारभाव.
Read More
सोयाबीन चे भाव वाढायला सुरुवात आज 29 ऑक्टोबर रोजी येथे मिळाला सर्वाधिक दर.
सोयाबीन चे भाव वाढायला सुरुवात आज 29 ऑक्टोबर रोजी येथे मिळाला सर्वाधिक दर.
Read More

पंजाब डख म्हणतात चक्रीवादळ महाराष्ट्रातून जानार राज्यात एवढे दिवस मुसळधार पाऊस.

पंजाब डख म्हणतात चक्रीवादळ महाराष्ट्रातून जानार राज्यात एवढे दिवस मुसळधार पाऊस.

राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस हा पुढील तीन दिवसांसाठी म्हणजेच २८, २९ आणि ३० ऑक्टोबर दरम्यान कायम राहणार आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यात भाग बदलत पडेल. काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस असेल, तर काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडेल इतका जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. राज्यातील नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी, मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव यांसह सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस दररोज वेगवेगळ्या भागात हा पाऊस हजेरी लावेल. हा पाऊस प्रामुख्याने रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटासह असणार आहे, तर काही ठिकाणी दुपारनंतर तो सुरू होईल.

राज्यात पाऊस येण्याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही समुद्रांमध्ये (अरबी समुद्र आणि बंगालची खाडी) तयार झालेले दोन कमी दाबाचे पट्टे हे चक्रीवादळात रूपांतरित झाले आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळ गुजरातकडे जाऊन ओमानकडे सरकेल, तर बंगालच्या खाडीतील चक्रीवादळ तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश करून पूर्व विदर्भातून छत्तीसगड आणि आसामकडे सरकेल. या दोन चक्रीवादळांच्या बाष्प खेचण्याच्या प्रक्रियेमुळेच महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.

या प्रणालीमुळे, पूर्व विदर्भात (बंगालच्या खाडीच्या प्रणालीमुळे) आणि उत्तर महाराष्ट्रात/कोकणपट्टीत (अरबी समुद्राच्या प्रणालीमुळे) पावसाचे प्रमाण अधिक राहील. तर या दोन्ही वादळांच्या मधोमध असलेल्या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत आणि विखुरलेल्या स्वरूपाचा जोरदार पाऊस पडेल.

Leave a Comment