नोव्हेंबरमध्ये पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा, पहा तोडकर हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाजानुसार,२७ ऑक्टोबर रोजी पावसाचे आगमन पुन्हा एकदा नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. सोलापूर, पुणे भागावर पावसाचे रडार कायम राहील. मराठवाड्यात मात्र ‘मोंथा’ नावाच्या चक्रीवादळामुळे वातावरणाची मोठी व्याप्ती नसून फक्त तुरळक ठिकाणी स्थानिक पाऊस पडेल. नंदुरबार, शहादा, धुळे, जळगाव आणि कर्नाटकच्या हुबळीतही २७ ला पावसाची हजेरी असेल असा अंदाज तोडकर यांनी दिलाय…
२८ आणि २९ ऑक्टोबरला पावसाचा जोर वाढणार.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा (लोप्रेशरचा) प्रभाव २८ ऑक्टोबरपासून मराठवाड्यामध्ये पुन्हा वाढणार आहे. यामुळे २८ आणि २९ ऑक्टोबर या दोन दिवशी नांदेड, नागपूर, पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, यवतमाळ, हिंगोली, अकोला, वाशिम या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याला २८ आणि २९ ऑक्टोबरला जास्त पावसाचा जोर असणार आहे.
२९ ऑक्टोबर हा दिवस २५ ऑक्टोबरपेक्षाही मोठा असेल, ज्यात अकोला आणि अमरावतीच्या बऱ्याच भागांमध्ये धुवाधार पावसाची नोंद होऊ शकते. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, खामगाव, बुलढाणा, मलकापूर, नाशिक, पुणे आणि परभणी, जालना, बीड जिल्ह्यांमध्येही २९ तारखेला पाऊस सक्रिय राहील. या काळात वाऱ्यासह थंडावा आणि गारवटपणा जाणवेल. ,(तोडकर हवामान अंदाज)




















