गहु पिकांना पेरणी बरोबर कुठली खते द्यावीत सविस्तर माहिती येथे पहा.
पेरणी करताना खत व्यवस्थापन
गव्हाची पेरणी करतानाच खते देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून पिकाला ती लवकर उपलब्ध होतील आणि चांगल्या वाढीस मदत करतील. गहू पिकाला नत्र (युरिया) ची सर्वाधिक गरज असते, त्यानंतर स्फुरद (फॉस्फरस) आणि पोटॅशची (पोटॅशियम) कमी प्रमाणात आवश्यकता असते.
दोन टप्प्यांमध्ये खत व्यवस्थापन.
खत व्यवस्थापन दोन टप्प्यांत करण्याचा सल्ला दिला आहे. पहिला टप्पा पेरणी करताना आणि दुसरा टप्पा गहू २५ ते ३० दिवसांचा झाल्यावर, म्हणजेच तणनाशक मारल्यानंतरच्या पुढील पाण्याला. तणनाशकामुळे पिकावर येणारा ताण कमी करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील खते उपयोगी ठरतात.
पेरणीसाठी खतांचे पर्याय
पेरणी करताना 10:26:26 या खताचा वापर करण्याची शिफारस केली आहे, ज्यात स्फुरद आणि पोटॅश जास्त प्रमाणात असते. याशिवाय, 12:32:16 किंवा 15:15:15 (तीन 15) यांसारखी खते देखील उत्तम आहेत.
















