म्हणलो होतो ना पाऊस येणार…आज पासून या जिल्ह्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ.
पंजाब डख हवामान अभ्यास ; राज्यात १६ ऑक्टोबरपासून ते २०/२१ ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडेल, मात्र तो सर्वदूर पडणार नाही. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन त्यानुसार आपले शेतीचे नियोजन करावे. हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा नसेल, तर विखुरलेल्या स्वरूपाचा असेल.
2) पेरणीसाठी शेतकऱ्यांसाठी सल्ला
ज्या शेतकऱ्यांनी आपली सोयाबीनची काढणी पूर्ण केली आहे, त्यांनी हरभरा किंवा ज्वारीची पेरणी करण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकता, जर तुमच्या शेतातील ओल (ओलावा) चांगली टिकून असेल. पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील ओलावा पाहून घ्यावा. तसेच, कांद्याचे बी (रोप) टाकण्यासाठी देखील आता पोषक वातावरण तयार झाले आहे.
3) सोयाबीन सुरक्षित ठेवण्याची सूचना.
सध्या राज्यात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणे चालू आहे किंवा काढलेले सोयाबीन उघड्यावर गंजीच्या (सुड्यांच्या) स्वरूपात ठेवलेले आहे. उद्या १५ ऑक्टोबरला हवामान निरभ्र राहिले तरी, १६ ऑक्टोबरपासून पाऊस सुरू होणार असल्याने, शेतकऱ्यांनी आपल्या उघड्यावरील सोयाबीनच्या गंज्या झाकून घ्याव्यात. तसेच कापून ठेवलेला मका देखील सुरक्षित ठिकाणी ठेवावा.




















