बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

माेंथा’ चक्रीवादळ ; विदर्भात अवकाळीचा तडाखा, शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावला!

माेंथा’ चक्रीवादळ ; विदर्भात अवकाळीचा तडाखा, शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावला!

दक्षिण भारतात घोंगावणाऱ्या ‘माेंथा’ चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे मोठे संकट ओढवले आहे. या वादळाचा विदर्भालाही जोरदार तडाखा बसला असून, बुधवारी रात्री विदर्भातील बहुतांश भागांत अवकाळीच्या मुसळधार सरी कोसळल्या. गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक होती. गुरुवारी दिवसा पावसाचा जोर काहीसा मंदावला असला, तरी दिवसभर रिपरिप आणि रिमझिम सुरूच राहिली. ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या ‘माेंथा’ चक्रीवादळाची सक्रियता आता दक्षिण भारताच्या तामिळनाडू किनारपट्टीकडे वळली आहे. या प्रभावामुळे विदर्भात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस म्हणजे २ नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचे हे सावट कायम राहणार आहे. पहिल्या दोन दिवसांत ढगांनी शांतता बाळगली, पण बुधवारी रात्री जोरदार सरी कोसळल्या. गडचिरोलीत सर्वाधिक ७२.२ मि.मी., चंद्रपूरमध्ये ६६ मि.मी., तर अमरावतीत ५९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय, वर्धा (३१ मि.मी.), भंडारा (२७ मि.मी.), यवतमाळ (२० मि.मी.), बुलढाणा (१४ मि.मी.), अकोला (१३.३ मि.मी.), आणि नागपूरमध्ये (१०.८ मि.मी.) पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा भागात ८२.९ मि.मी. तर नागपूर जिल्ह्यात कामठी तालुक्यात २३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

गुरुवारी सकाळपासूनच रिपरिप सुरू होती आणि थांबून थांबून दिवसभर पावसाचे सत्र सुरू राहिले. रात्रीही पावसाची संततधार कायम होती.

Leave a Comment