गव्हाचे टॉप वाण ; भरघोस उत्पन्न देणारे गहु पिकाचे टॉप वाण.
रब्बी हंगामात गव्हाची लागवड करण्यापूर्वी, शेतकऱ्यांनी उत्पादनाची क्षमता आणि धान्याची गुणवत्ता पाहून योग्य वाणाची निवड करणे महत्त्वाचे आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रमुख वाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सर्वाधिक उत्पादन देणारे वाण
श्रीराम सुपर ३०३: उत्पादनाच्या बाबतीत श्रीराम सीड्स कंपनीचे ‘श्रीराम सुपर ३०३’ हे वाण अतिशय प्रसिद्ध आहे. विशेषतः पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये या वाणाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते, जिथे याची मोठी मागणी आहे. या वाणाची उत्पादन देण्याची क्षमता खूप जास्त आहे. महाराष्ट्रात या वाणाची उपलब्धता काहीवेळा कमी असते, तरीही जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी या वाणाचा विचार नक्की करू शकता.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
खाण्यासाठी सर्वोत्तम आणि चवदार वाण
श्रीराम सुपर १११: खाण्यासाठी उत्तम चव असणारे आणि पोळीची गुणवत्ता टिकवून ठेवणारे वाण म्हणून ‘श्रीराम सुपर १११’ हे अतिशय लोकप्रिय आहे. या गव्हाची सर्वात मोठी खासियत म्हणजे, याची चपाती २४ तास ठेवल्यानंतरही कडक होत नाही, ती एकदम मऊ आणि मुलायम राहते. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना घरच्या वापरासाठी उत्तम आणि चवदार पोळीचा गहू हवा आहे, त्यांनी सुपर १११ या वाणाची लागवड करायला विसरू नये.
उत्पादन आणि खाण्याची गुणवत्ता या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणारे काही वाण उपलब्ध आहेत:
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
अजित १०२ आणि अजित १०८: अजित सीड्स कंपनीचे ‘अजित १०२’ आणि ‘अजित १०८’ हे वाण खाण्यासाठी चांगले असून, त्यांचे उत्पादनही चांगले मिळते.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पॅसिफिका ९२९४: पॅसिफिका कंपनीचे ‘पॅसिफिका ९२९४’ हे वाणदेखील लांब ओंबी आणि चांगल्या दाण्यासाठी ओळखले जाते. हे वाण खाण्यासाठी आणि उत्पादनासाठी दोन्ही दृष्टीने चांगले आहे. याव्यतिरिक्त, पॅसिफिका कंपनीच्या ‘दामिनी’ या संशोधन वाणाचाही विचार करता येतो.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
माहीको मुकुट: माहीको सीड्स कंपनीचे ‘मुकुट’ हे वाण देखील खाण्यासाठी चांगले आहे आणि उत्पादनही चांगले देते.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
कमी पाणी आणि प्रादेशिक पसंतीचे वाण
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे, परंतु गहू पीक लावायचे आहे आणि चांगले उत्पादनही घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी खालील वाण उपयुक्त ठरू शकतात:
लोकवन: कमी पाणी असलेल्या भागांसाठी ‘लोकवन’ हे वाण उपयुक्त ठरू शकते. लोकवन हे कोणत्याही एका विशिष्ट कंपनीचे संशोधन नसून अनेक कंपन्यांचे बियाणे उपलब्ध असते.
अंकुर केदार: अंकुर सीड्स कंपनीचे ‘केदार’ हे वाण खाण्यासाठी चांगले असून, त्याला विदर्भ भागातील शेतकऱ्यांची चांगली पसंती मिळाली आहे.